भुयारात अडकलेल्या दोन मजुरांची नऊ दिवसांनी सुटका

भुयारात अडकलेल्या दोन मजुरांची नऊ दिवसांनी सुटका

हिमाचल प्रदेशात बांधकाम सुरु असलेल्या भुयाराचा काही भाग कोसळल्याने त्यात अडकलेल्या तीन मजुरांपैकी दोन मजुरांना तब्बल नऊ दिवसांनी सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. तर एका मजुराबाबत अद्याप समजू शकलेलं नाही.

कीरतपूर-मनाली रस्ता योजनेतील 1.2 किलोमीटरच्या प्रस्तावित भुयाराचा काही भाग 12 सप्टेंबर रोजी कोसळला होता.

एनडीआरएफच्या जवानांनी तब्बल 211 तासाच्या बचाव कार्यानंतर मजुरांना बाहेर काढले. याआधी दोन मजुरांचं व्हिडीओ फुटेज जारी करण्यात आलं होतं.

एनडीआरएफ दलाचं नेतृत्त्व करणारे अधिकारी जयदीप सिंह यांनी सांगितलं की, भुयाराच्या छतामध्ये एक फुटाचा छेद करुन दोन्ही मजुरांना वाचवण्यात आम्हाला यश आलं.

मणि राम आणि सतीश तोमर या दोन्ही मजुरांसोबत वेब कॅमेऱ्यासोबत असलेल्या मायक्रोफोनद्वारे सातत्याने संपर्कात होतो. मात्र तिसरा मजूर हृदय राम कोणत्या ठिकाणी अडकला आहे, याबाबत अद्याप समजू शककेलंल नाही, असंही जयदीप सिंह म्हणाले.

आमच्या अंदाजानुसार, भुयाराच्या आत सुमारे तीन फूटांपर्यंत पाणी होतं. त्यामुळे मजूरांच्या पाण्याची अडचण दूर झाली, असं जयदीप सिंह यांनी सांगितलं.

मजुरांना बाहेर काढण्यासाठी 42 मीटर खोल सरळ रस्ता बनवला होता आणि त्यानंतर मजुरांची सुटका करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *