मध्यप्रदेशातील रायसेनमध्ये अमानुषपणाचा कळस गाठण्यात आला आहे. शाळकरी मुलांना चक्क झाडाला उलटं लटकवून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शाळकरी मुलांच्या काकानंच ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मारहाण करतानाची सगळी दृष्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मात्र, या प्रकरणी कोणीही तक्रार केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 13 वर्षीय आपल्या पुतण्याला सुधरविण्यासाठी झाडाला उलटं लटकवून काकाने त्याला चाबकाने फटके दिले. मारहाणीचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे.

