पश्चिम रेल्वेच्या विस्कळीत वाहतुकीचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांनाही बसला आहे. कारण प्रत्येक स्टेशनला उसळलेली गर्दी आणि उशिरा धावणाऱ्या लोकलमुळे डबेवाल्यांची साखली विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातून येणारे आणि पश्चिम उपनगरात जाणारे डबे, तसंच त्या त्या भागातील डबे पोहोचवण्यासाठी व्यत्यय येत आहे.
परिणामी आज मुंबईकरांना घरचा डब्बा मिळणार नाही. डबेवाल्यांनी आज डबा न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी याबाबतची माहिती दिली.
त्यामुळे प्रवासामुळे वैतागलेल्या मुंबईकरांना आज घरच्या डब्ब्याचा आस्वाद घेता येणार नाही.

