गाय, म्हैस, कुत्रा, मांजर यांचीही ऑनलाईन खरेदी विक्री?

गाय, म्हैस, कुत्रा, मांजर यांचीही ऑनलाईन खरेदी विक्री?

ओएलएक्स आणि क्विकरसारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटची सध्या मोठ्या प्रमाणावर चलती आहे. हल्लीच्या घाई-गर्दीच्या जगात अधिकाधिक लोक ऑनलाईन शॉपिंग करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, घरातील एखादी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅजेट्स किंवा अगदी पुस्तक-कपड्यांपर्यंत हे सर्व ठीक होतं. मात्र, आता चक्क गाई आणि म्हशींचीही ऑनलाईन खरेदी सुरु झाली आहे.

काही क्लासिफाईड्स वेबसाईट्सनी गाय आणि म्हशींसारख्या प्राण्यांचीही ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. यामध्ये जास्तीत जास्त पाळीव प्राणी विकली जात आहेत. कुत्रा, मांजर, पोपट यांचा यात समावेश आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था आधुनिकतेकडे झुकत आहे. त्यामुळे याचा फायदाही तेवढ्याच प्रमाणात होत आहे. अशाप्रकारे गाय, म्हैस, कुत्रा या पाळीव प्राण्यांची ऑनलाईन विक्री होऊन मधल्या दलालांची गरजही कुणाला भासत नाही.

ऑनलाईन विक्रीमुळे सर्वात मोठा फायदा असा झाला आहे की, ट्रान्सपोर्टशनचा खर्च पूर्णपणे कमी झाला आहे. बाजारात जाऊन एखादा नवीन कुत्रा विकत घेण्याऐवजी थेट ऑनलाईन मागवलं जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *