मोदी-शरीफ भेटीची शक्यता कमीच

मोदी-शरीफ भेटीची शक्यता कमीच

न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट होण्याची शक्यता कमीच असल्याचे पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये दोघांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता लक्षात घेउन कायमस्वरूपी सदस्य असलेल्या राष्ट्रांनी या दोघांची समोरासमोर भेट टाळण्याचे प्रयत्न चालविले असल्याचे ‘डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
मागील वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत मोदी यांनी पाकिस्तानला डोस पाजताना दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबविल्याशिवाय दोन्ही देशांमध्ये चांगले वातावरण तयार होणार नसल्याचे म्हटले होते. शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा बैठकीत उपस्थित केल्यानंतर मोदी यांनी हे वक्तव्य केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *