बंदुकीचा धाक दाखवून ३५ लाखांचा ऐवज लंपास

बंदुकीचा धाक दाखवून ३५ लाखांचा ऐवज  लंपास

सातारा येथे कोल्हापूर-मुंबई महामार्गावर हॉटेलजवळ थांबलेल्या एसटी प्रवाशाला बंदुकीच्या धाक दाखवून 35 लाखांचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात दरोडेखोरांनी लुटल्याची घटना घडली आहे.

काल रात्री 12 वाजेच्या दरम्यान, बोरगाव येथे कोल्हापूर-मुंबई महामार्गावार ही घटना घडली. जेवणासाठी थांबलेल्या एसटीतील प्रवाशाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लाखोंचा ऐवज लंपास केला.

प्रवाशाला बंदुकीचा धाक दाखवून आणि डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणारे अज्ञात दरोडेखोर इनोव्हा गाडीतून पळून गेल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. जखमी प्रवाशाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *