तब्बल २१ तासांच्या खोळंब्यानंतर पश्चिम रेल्वेवरचं दुरुस्तीचं काम अखेर पूर्ण झालं आहे. ज्या रुळावर अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यान काल लोकलचे डबे घसरले होते. त्या रुळावरुन थोड्याच वेळापूर्वी लोकल वाहतूक सुरु झाली. मात्र, वाहतूक पूर्णपणे सुरळीत आणखी तासाभराचा कालावधी लागणार असल्याची माहिती प. रेल्वेकडून देण्यात आली आहे.
आज सकाळपासून चर्चगेटकडून विरारला येणारी वाहतूक बंद होती. तर विरारहून चर्चगेटची वाहतूक ही धीम्या गतीनं सुरु होती. तसेच यामुळे अनेक रेल्वेही रद्द करण्यात आल्या आहेत.
हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी, दर पंधरवड्यात होणाऱ्या रेल्वेच्या रखडपट्टीमुळे मात्र मुंबईकर संताप व्यक्त करत आहेत.

