लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणाऱ्या 1,500 रुपयांवर दिल्लीत मंथन; पुढे नेमकं काय होणार?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासा देणारी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्य सरकारकडून दरमहा मिळणाऱ्या 1,500 रुपयांच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने केली आहे. महागाईचा वाढता परिणाम आणि बदलत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर या योजनेतील मदतीचा वेळोवेळी फेरविचार करण्याची गरज असल्याचे परिषदेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे भविष्यात या योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारलाच घ्यावा लागणार आहे.

सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही रक्कम वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सरकारने अद्याप त्यावर अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. अशातच आर्थिक सल्लागार परिषदेच्या शिफारसीमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

महाराष्ट्रतली योजना ठरली लक्षवेधी

या अभ्यासात महाराष्ट्रातील ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ आणि ओडिशातील ‘सुभद्रा योजना’ या दोन योजनांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. महिलांच्या बचतीत वाढ, दैनंदिन खर्चाचे सुधारलेले नियोजन आणि शिक्षण-आरोग्यावर वाढलेला खर्च ही या योजनांची सकारात्मक बाजू असल्याचे परिषदेने नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *