६५ वर्षीय महिलेवर अत्याचार करुन जीव घेतला, 182 CCTV तपासले, चिप्सच्या रिकाम्या पाकिटाने नराधम सापडला

नागपूर  जिल्ह्यात गाजत असलेल्या महिलेवरील अत्याचार व खुनाच्या रहस्यमय ठरत असलेल्या प्रकरणाच्या तपासाला चिप्सच्या पाकिटावरून दिशा मिळाली. ग्रामीण पोलिसांनी ‘मार्व्हल’ या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे मारेकऱ्याला गजाआड केले. सुधाकर दादाराव मंडपे (वय ४८, रा. भन्साळी टाकळी, ता. सावनेर) असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. मृत ६५ वर्षीय महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही.

सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगीतील एका शेतात २८ जून रोजी ६५ वर्षीय महिलेची बॉडी आढळली होती. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवालात अत्याचार केल्यानंतर हाताने गळा आवळून तिचा खून झाल्याचे नमूद करण्यात आले. पोलिसांनी अत्याचार व खुनाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

जिल्ह्यात हे प्रकरण चांगलेच गाजत असल्याने या रहस्यमय अत्याचार करून खून प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांसमोर उभे ठाकले. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर खर्डे यांना या हत्याकांडाचा छडा लावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांसह विविध पथकांनी तपास सुरू केला.

चिप्सचे रिकामे पाकिट

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता परिसरात चिप्सचे रिकामे पाकिट आढळले. दारू पिऊन अत्याचार केल्यानंतर महिलेचा खून करण्यात आला असावा, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी पाटणसावंगीसह विविध ठिकाणी मृत महिला व मारेकऱ्याची ओळख पटविणे सुरू केले.

१८२ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी

दहेगाव परिसरातील दुकानांमध्ये चिप्सचे पाकिट विकले जात असल्याचे कळताच पोलिसांनी या दुकानांमध्ये चौकशी केली. या परिसरातील १८२ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. एका फुटेजमध्ये लाल रंगाचे शर्ट व टोपी घातलेला इसम आढळला. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. परंतु, त्याचा चेहरा अस्पष्ट होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारेकऱ्याचे त्यावेळेच दूरचे छायाचित्र काढले. मार्व्हलच्या मदतीने त्याचे संपूर्ण छायाचित्र तयार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *