योगगुरु रामदेव बाबांची मागणी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा!

योगगुरु रामदेव बाबांची मागणी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा!

नेहमी वेगवेगळ्या विधानांनी चर्चेत असणारे योगगुरु बाबा रामदेव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी बाबा रामदेव यांनी गाईला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

जोधपूरमधील एका कार्यक्रमात योग विद्येवर बोलताना रामदेव त्यांनी ही मागणी केली. यासाठी रामदेव यांनी कुराण आणि बायबलचा दाखला दिला आहे.

कुराण आणि बायबलनुसार मांस भक्षण करणं गुन्हा असल्याचंही त्यांनी सांगितलं. याचसाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करुन देशात गो-हत्येवर बंदी आणण्याची मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *