माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची टपाल तिकीटं लवकरच हद्दपार केली जाणार आहेत. माहिती तंत्रज्ञान खात्याच्या आदेशानुसार ही तिकीट रद्द करण्यात येणार आहेत. त्याऐवजी आता दीनदयाळ उपाध्याय, जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राममनोहर लोहिया यांची छायाचित्रं असलेली तिकीटं प्रसिद्ध होतील.
2008 मध्ये यूपीए सरकारने नव्या 8 तिकीटांची मालिका सुरु केली होती. ज्यात इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या पाच रुपये किमतीच्या तिकीटांचा समावेश होता. मात्र सात वर्षांनी ही तिकीटं हद्दपार केली जाणार आहेत.
भाजप सरकारही आता नव्या तिकीटांची मालिका सुरु करत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा, पंडित भीमसेन जोशी, पंडित रवीशंकर यासारख्या 24 दिग्गज व्यक्तींचा समावेश असेल.

