नरेंद्र मोदी फेसबुक मुख्यालयाला देणार भेट

नरेंद्र मोदी फेसबुक मुख्यालयाला देणार भेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत, अशी माहिती खुद्द फेसबुकचा निर्माता आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनीच दिली. त्यानी फेसबुक पोस्ट केली आहे.

रविवारी २७ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता ही भेट होईल. त्यावेळी जो लाईव्ह कार्यक्रम होईल. त्याचा व्हिडिओ अपलोड केला जाईल, असेही या पोस्टमध्ये मार्कने म्हटलेय. ही पोस्ट पंतप्रधान मोदी यांच्या पेजवरही असेल, असेही स्पष्ट केलेय. याआधी मोदी यांची भेट घेण्याचा योग आला. आता मोदीच आमच्या मुख्यालयाला भेट देत असल्याने हा आमच्यासाठी सन्माजनक बाब आहे, असे मार्क यांनी म्हटलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *