24 तासात पाकचा खरा चेहरा जगासमोर, राजोरीत पाककडून गोळीबार

24 तासात पाकचा खरा चेहरा जगासमोर, राजोरीत पाककडून गोळीबार

नवी दिल्लीत पाकिस्तानी रेंजर्स आणि बीएसएफमध्ये झालेल्या करार करुन 24 तासाच्या आतचं पाकिस्तानने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.

पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाल्याचं समोर येतं आहे. पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात मोटार शेल्सचा मारा करण्यात आला ज्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्यपत्तर दिलं. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला आहे.

पाकिस्तानकडून अशाच प्रकारे गोळीबार होत राहिल्यास आम्ही प्रतिहल्ला करायला मागेपुढे पाहणार नाही. असा इशाराही राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. असं जरी असलं तरी राजौरीच्या घटनेनंतर पाकिस्तानी सैन्यावर किती विश्वास ठेवायचा हा मुद्दा समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *