पर्युषण काळात मांसबंदीचा मनसैनिकांकडून निषेध

पर्युषण काळात मांसबंदीचा मनसैनिकांकडून निषेध

जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वातील मांसबंदीच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उडी घेतल्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. श्रावण महिना संपताच पार्ल्यातील गुजराती सोसायटीच्या समोरच्या मैदानात बसून मनसे कार्यकर्त्यांनी नॉनव्हेजवर ताव मारला.

जैन समुदायाच्या रहिवाशांची संख्या जास्त असलेल्या या सोसायटीच्या गेटसमोर मनसैनिकांनी कोंबडी आंदोलन करत नॉनव्हेज बिर्याणीवर ताव मारला. जैन पर्यूषण पर्वातील महापालिका स्तरावरची वाढीव दिवसांची मांसविक्रीवरील बंदी हटवण्यात आली आहे. मात्र या वादावर पडदा पडावा असं राजकीय पक्षांना वाटत नसावं असं चित्र मनसैनिकांच्या आंदोलनातून निर्माण झालं आहे.

आमच्या घरात आम्ही काय खायचं हे कुणी शिकवू नये असं सांगत राज ठाकरेंनी मांसबंदीच्या वादात उडी घेतली होती. मनसे कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वाद शमण्यापेक्षा अधिक पेटण्याचीच चिन्ह आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *