राधे माँवर सुरू असलेल्या एका टीव्ही डिबेट शोमध्ये कथित संत आणि एका महिला जोतिष्याची हाणामारी झाली. महिला ज्योतिषीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या कथित संताला महिला ज्योतिषीने कानाखाली लगावली. त्यानंतरत्या कथित संतानेही त्या महिलेच्या कानाखाली मारली. हे सर्व टीव्ही कॅमेऱ्यासमोर घडले.
दीपा शर्मा या महिलेचे नाव असून हिंदू महासभेचे कथित संत ओम जी यांच्यात हाणामारी झाली. दीपा शर्मा आपल्या पतीपासून दूर राहतात असे यांनी म्हटले त्यानंतर दीपा शर्मा यांनी आपला माईक काढला आणि त्या ओम जी यांच्याकडे गेल्या…
तोंड सांभाळून बोला. असे म्हणून त्यांनी ओम जी यांच्या कानाखाली लगावली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ओम जी गडबडलेले पण त्यांनी समोर महिला असल्याचे भान न ठेवता. त्यांनी पुन्हा दीपा शर्मा यांच्या कानाखाली लागावली त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्की झाली आणि मग अँकरने हा वाद मिटविला.

