सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील पुलगम टेक्सटाईल कारखान्याला लागलेली भीषण आग 3 तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीत 40 लुम्स जळून खाक झाले आहेत. तर लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आज सकाळी लागलेल्या आगीनंतर कारखान्यातील यंत्रांनीही पेट घेतल्यामुळे ही आग आणखी भडकली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. पण कारखान्यापर्यंत पोहोचणारा रस्ता बराच अरुंद असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला अडचणी येत होत्या.
दरम्यान ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

