काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट

काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट

स्लोवेनियाच्या एका बाईक रायडरने आपल्या गो प्रो कॅमेऱ्यामध्ये एका खास राईड कॅप्चर केली आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहताना काही वेळ तुमचा श्वास रोखला जाईल. मात्र, राईडचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बाईक चालवणाऱ्या प्रिमोज रावनिकच्या या धाडसी स्टंटला सलाम कराल.

प्रिमोज हा एक बाईक राईडर आहे आणि तो असे स्टंट कायम करतच असतो. यावेळी त्याने 60 मीटर उंचीच्या एका डॅमवरुन सायकल चालवण्याचा स्टंट केला आहे. सायकल एवढ्या वेगात जाते की, अगदी काही क्षणांत प्रिमोज डॅममध्ये जातो. हेल्मेटवर लावलेल्या कॅमेऱ्याने हा संपूर्ण स्टंट कॅप्चर केला आहे.

डॅमच्या कठड्यावरुन खाली जाताना सायकलचा स्पीड कमालीचा वाढतो आणि सायकल थेट पाण्यात पाडते. केवळ 49 सेकंदांचा हा स्टंट व्हिडीओ पाहणाऱ्याचा श्वास रोखून धरतो. यू ट्यूबवर हा व्हिडीओ आतापर्यंत 32 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि प्रत्येकजण प्रिमोजची स्तुती करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *