सलमानला दुबईला जाण्यास परवानगी

सलमानला दुबईला जाण्यास परवानगी

मुंबई – हिट अँड रन प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर जामीनावर कारागृहाबाहेर असलेला अभिनेता सलमान खान याला आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयाने दुबईला जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
 
मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला 2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनाविली आहे. या शिक्षेविरोधात सलमानने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. पण, न्यायालयाने त्याला पासपोर्ट जमा करण्यास सांगत देशाबाहेर परवानगीशिवाय न जाण्याचे सांगितले होते. त्यामुळे सलमानने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करताना म्हटले आहे, दुबईत 29 मे रोजी एक कार्यक्रम असून, त्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी आपल्याला परवानगी देण्यात यावी.
न्यायालयाने आज सलमानच्या अर्जावर सुनावणी करताना त्याला परदेशात जाण्याची परवानगी दिली. पण, त्याला कनिष्ठ न्यायालयात दोन लाख रुपयांची हमी देण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *