केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात दिल्लीतील न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी दाखल केलेली याचिका आज (मंगळवार) त्यांनी मागे घेतली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात केजरीवाल यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. पण, आज त्यांनी ती मागे घेतली आहे. याचिका मागे घेण्यामागील कारण समजू शकले नाही. न्यायाधीश संजीव खन्ना व आशुतोष कुमार यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांनी याचिका रद्द करण्याची विनंती मान्य करत, याचिका रद्द करण्याची परवानगी दिली आहे.
आम आदमी पक्षाने प्रसिद्ध केलेल्या देशातील सर्वाधिक भ्रष्ट व्यक्तींच्या यादीमध्ये नितीन गडकरी यांच्याही नावाचा उल्लेख होता. याच आरोपावरून गडकरी यांनी केजरीवाल यांच्याविरोधात बदनामीची याचिका दाखल केली होती. या संदर्भात दिल्लीतील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.