सिंकदराबादवरून मुंबईकडे येणा-या दुरांतो एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून आठजण गंभीर जखमी आहेत.
कर्नाटकमधील कलबुर्गीजवळ असलेल्या मरतूर गावामध्ये शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरून ही दुर्घटना घडली.
पोलिस व रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रुळाला तडे गेल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातातील जखमींना कलबुर्गीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेची दखल घेऊन जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना तातडीने मदत जाहीर केली आहे.
हेल्पलाईन क्रमांक :
गुलबर्गा : ०८४७-२२५५०६६/२२५५०६७
सिकंदराबाद : ०४०-२७७००९६८
सोलापूर : ०२७१-२३१३३३१
सीएसटी : ०२२-२२६९४०४०
एलटीटी कुर्ला : ०२२-२५२८८०००५
कल्याण : ०२५१-२३११४९९

