गणपती उत्सवाची शाळा, कॉलेजला 5 दिवसांची सुट्टी?

गणपती उत्सवाची शाळा, कॉलेजला 5 दिवसांची सुट्टी?

राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. विशेष कोकणात जोरदार तयारी असते. त्यामुळे शाळा, कॉलेजना सुट्टी देण्याची मागणी जोर धरते. गतवर्षी शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावर्षीही पाच दिवसांची सुट्टी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ही मागणी मान्य झाली तर मुंबईत शाळा, कॉलेजना पाच दिवसांची सुट्टी मिळेल.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शालेय शिक्षण विभागाकडे गणेशोत्सवासाठी सुट्टी देण्यासाठी मागणी केली आहे. गतवर्षी सर्व शाळांना पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन यंदाही ही सुटी जाहीर करावी, अशी मनविसेने मागणी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी आणि मुंबई शिक्षण उपसंचालकांकडे निवेदन देऊन शाळा, कॉलेजला सुट्टी देण्याची मागणी केल्याची माहिती मनविसेचे उपाध्यक्ष सुधाकर तांबोळी यांनी दिलेय. तसेच मुंबई विद्यापीठाला निवेदन देण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची मनसे भेट घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *