बीडमधील एक प्रसंगाने माय-लेकाचं नातं आणखी दृढ

बीडमधील एक प्रसंगाने माय-लेकाचं नातं आणखी दृढ

एकीकडे आईला घराबाहेर काढण्यासारखे ह्रदयद्रावक प्रकार समोर येत आहेत. मात्र बीडमधील एक प्रसंगाने माय-लेकाचं नातं आणखी दृढ झालं आहे. आई सरपंच होणार म्हणून लेकाने चक्क तिला हेलिकॉप्टरची वारी घडवली आहे. शेताच्या बांधापलिकडं न गेलेल्या आईला हे सारं नवीन आणि आश्चर्याचा धक्का देणारं होतं. यावेळी या मायेचे डोळे पाणावले नसते, तरच नवल.

आई सरपंच होईल, तेव्हा तिला हेलिकॉप्टर वारी घडवेन, असा निश्चय केलेल्या मुलाने आज तो निश्चय पूर्ण केला आहे. परळीतल्या कन्हेरवाडीच्या सरपंच बनणाऱ्या प्रभावती फड यांच्या सोबत इतर चौघांना हेलिकॉप्टर वारी घडल्याने परिसरात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

शपथविधीसाठी सरपंच थेट हेलिकॉप्टरमधून…

 परळीकराना हेलीकॉप्टर काही नवे नाही. पण हे हेलीकॉप्टर बघायला झालेली गर्दी जरा वेगळी आहे. कारण ही तसंच आहे. उद्या होणाऱ्या सरपंचपदासाठीच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य चक्क हेलीकॉप्टर मधून येणार म्हणल्याने सगळ्यांनीच गर्दी केली.

प्रभावती फड यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात न मांडता येणारा

प्रभावती फड याआधी कधीही हेलिकॉप्टरमध्ये बसल्या नव्हत्या. पण त्यांच्या मुलाने त्यांना वचन दिले होते की सरपंचपदी निवड होताना मी तुला हेलीकॉप्टरमध्ये बसवेन आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये बसून आल्या. मला माझ्या मुलाने दिलेला शब्द पाळला हे सांगताना प्रभावती बाईच्या चेहऱ्यावर शब्दात न मांडता येणारा आनंद दिसून येत होता.

पुणे ते परळी एका तासाचा हवाई सफर

कन्हेरवाडी ग्रामपंचायतीमध्ये एकूण 11 सदस्य आहेत. त्यापैकी 7 सदस्य हे राजाभाऊ फड यांच्या ताब्यात आहेत. सरपंचपदाच्या या निवडीमुळे प्रथमजित रोडे आणि या कुसुमबाई नची मात्र चांगलीच हेलिकॉप्टर वारी झाली. पुण्याहून परळीपर्यंत असा एका तासाचा प्रवास या ग्रामपंचायत सदस्यांना चांगलाच सुखावून गेला.

राजाभाऊ फड हे रासपच्या युवा संघाटनाचे प्रदेशाध्याक्ष्य आहेत. या ग्रामपंचायतीवर रासपची सत्ता आणण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न चर्चेचा विषय बनला आसला तरी दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या बीड जिल्ह्यासाठी हा शाही थाट कसाचे द्योतक आहे, हा प्रश्न मात्र आनुत्तरित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *