विद्यार्थ्यांना त्रास देत असल्यामुळे ग्रामस्थांनी या शिक्षकाच्या बदलीची मागणी केली होती. त्याच रागातून शिक्षकाने चाकूहल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे.
यातील मुख्य आरोपी मुंकुंद खत्रेसह तिघेजण फरार आहेत. दरम्यान पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतल असून पुढील तपास सुरु आहे.
मुकुंद खेत्रे हा सुलतानपूर इथं जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. काही कारणास्तव खेत्रेने एका विद्यार्थ्याला शाळेतून हाकललं. त्यामुळे विद्यार्थ्याचे आई-वडिल शाळेत आले. मात्र त्यांनाही अरेरावीची भाषा करत, खेत्रेने त्यांनाही बाहेर जाण्यास सांगितलं.
या सर्वप्रकारामुळे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिक्षण विभागाकडे खेत्रेची तक्रार करत त्याच्या बदलीची मागणी केली.
या रागातून खेत्रेने सुलतानपुरातील महादेव खेत्रे आणि योगेश खेत्रेवर चाकूने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर या चाकूहल्ल्यात दीपक बनकर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.