मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील पेटलावड येथे आज (शनिवार) सकाळी एका हॉटेलमध्ये झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 50 हून अधिक जण जखमी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पेटलावडमधील थंतला रस्त्यावर हे तीन मजली हॉटेल आहे. हॉटेलमधील स्वयंपाकगृहात आज सकाळी सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे तीन मजली हॉटेल कोसळले. यावेळी हॉटेलमध्ये शंभरहून अधिक नागरिक वास्तव्यास होते. यातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 50 हून अधिक जण जखमी आहेत. जखमींना पेटलावडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पेटलावडमधील बस स्थानकाजवळच हे हॉटेल आहे. सिलिंडर स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध घेण्यात येत आहे.

