पोलीस शिपायाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पोलीस वाहनावर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटका आल्याने पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मुलुंड येथे घडली. रामा महाले (वय ४८) असे या पोलीस शिपायाचे नाव असून, ते मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

मुलुंड पोलीस ठाण्यातील मोबाईल क्रमांक १ या पोलीस वाहनावर ते चालक म्हणून काम करत होते. रविवारी मुलुंड परिसरात गस्त घालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना परिसरातील अगरवाल रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुलुंड पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *