खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकलचे डबे घसरले, सुदैवाने कोणीही जखमी नाही

हार्बर मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकात येत असलेल्या लोकल ट्रेनचे तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. यामुळे खारकोपर ते नेरुळ लोकल सेवा ठप्प झाली आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजून ४५ मिनीटांच्या सुमारास घडली.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. दुर्घटनेच्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी पोहचले असून लोकलचे डबे पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *