महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसात दमदार पाऊस झाला. घाटमाथ्यावर हवामानाकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. सलग दोन दिवस हा अलर्ट कायम होता. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील या लोकप्रिय घाटात झालेल्या पावसाने चेरापुंजीचा रेकॉर्डही मोडला आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली असून, ताम्हिणी घाटात जून-जुलैमध्ये 6 हजार मिमीहून अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या चेरापुंजीलाही ताम्हिणीने मागे टाकले. महाबळेश्वरमध्ये 5,500 मिमी, तर लोणावळ्यात 4,800 मिमी पावसाची नोंद झाली असून अनेक जुने विक्रम मोडले गेले.
1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यात ताम्हिणी घाटात तब्बल 6 हजार मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून या आकडेवारीने देशातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीलाही मागे टाकले आहे. ताम्हिणी घाटाची वार्षिक सरासरी 6 ते 7 हजार मिमी आहे. तर, यंदा 6 ते 8 जुलै दरम्यान 72 तासांत 1,635 मिमी पाऊस झाला. या 72 तासांच्या पावसाने वर्षातील अर्धा कोटा पूर्ण केला आहे.
महाबळेश्वरमध्ये 5 हजार 500 मिमीसह 123 वर्षांचा तर लोणावळ्याने 4 हजार 800 मिमी पावसासह इतिहास मोडित काढला आहे. त्याचबरोबर, पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी, मुळशी, भिरा, अंबवने, लोणावळा, धावडी या घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असतो.
ताम्हिणी घाटात दोन महिन्यांत तब्बल 6 हजार मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. येथील वार्षिक सरासरी 6,000 ते 7,000 मिमी आहे. 6 जुलै रोजी 525, 7 जुलैला 530 आणि 8 जुलैला 580 मिमी असा पाऊस पडला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये जून-जुलैमध्ये एकूण पाऊस 5 हजार 500 मिलिमीटरवर पोहोचला आहे. 6 जुलै रोजी 24 तासांत तब्बल 513 मिमी विक्रमी पाऊस झाला आहे.
जुलै महिन्यातील महाराष्ट्राचा पाऊस
‘एल निनो’च्या काळात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रणालींनी यंदा राज्याला, तसेच धरणक्षेत्रालाही दिलासा दिला आहे. जूनमध्ये राज्याच्या अनेक भागांत मान्सूनने निराशा केल्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसाने जोरदार पुनरागमन केले. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, 1 ते 31 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत 40 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. राज्यात सरासरी 324.2 मिलीमीटर पावसाऐवजी 445.2 मिलीमीटर पाऊस झाला.
