रिक्षा चालकांची दादागिरी बँक कर्मचाऱ्याला पडली महागात, विकृतीचा पुन्हा नवा नमुना

विरारच्या ग्लोबल सिटी मध्ये एका बँक कर्मचाऱ्याला रिक्षाचालकांच्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुनीत मारवाह असं या जखमी कर्मचाऱ्याचे असून त्यांनी ग्लोबल सिटी येथील आपल्या एम एव्हेन्यू बिल्डिंगचा गेट अडवून नेहमी उभ्या असणाऱ्या रिक्षाचालकांना मज्जाव केला होता. या गोष्टीचा राग मनात धरून पाच ते सहा रिक्षाचालकांनी मिळून पुनीत यांना बिल्डिंग मध्ये घुसून मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अर्नाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी रिक्षा चालकांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारवरून रिक्षा चालकांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एरणींवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *