पुन्हा Lockdown? जगाचं टेन्शन वाढलं!

देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना दिसत आहे. नवीन रुग्णांची संख्या 500 हून कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 406 नवीन कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झाली असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चीनमध्ये  पुन्हा एकदा कोरोनाचा कहर  पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस येथील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. परिणामी अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन  लावण्यात आलं आहे.

अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, चीनमध्ये महामारी सुरू झाल्यापासून कोरोना  रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. नॅशनल हेल्थ ब्युरोने सांगितले की चीनमध्ये बुधवारी 31,454 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.  त्यापैकी 27,517 मध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. चीनची 1.4 अब्ज लोकसंख्या पाहिली तर हा आकडा खूपच कमी असला तरी त्यामुळे चीनमध्ये भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. या वर्षी एप्रिलमध्ये चीनमध्ये 29,390 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *