काहीवेळा मजा मस्ती करणं जिवावर बेतल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका तरूणाच्या पार्श्वभागात त्याच्याच मित्रांनी चक्क लाटणं घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबईमधील बदलापूरच्या मोहपाड इथली आहे
12 नोव्हेंबरला एक तरूण त्याच्या मित्रांची घरी गेला होता. गेल्यावर तिथं आणखी तीन-चार मित्र आलेले होते. मित्रांनी मस्ती मस्तीत त्याला शारीरिक त्रास द्यायला सुरूवात केली. यादरम्यान त्यांनी पीडित मित्रासोबत लैगिंक चाळे केले आणि त्याचा व्हिडीओ बनवला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मित्रांनी पीडित तरूणाच्या पार्श्वभागात लाकडी लाटणं घातलं. यामुळे त्याला गंभीर जखमा झाल्या त्यानंतर त्याने दवाखान्यात जात उपचारही घेतले.
संबंधित मित्रांनी त्याला व्हिडीओ पाठवत ब्लॅकमेल करायला सूरूवात केली. वैतागलेल्या पीडित तरूणाने बदलापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपी मित्रांवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समजत आहे. ताब्यात घेतलेल्या मुलं ही अल्पवयीन असून त्यातील एक आरोपी 25 वर्षांचा आहे. पोलीस आता योग्य ती कारवाई करत आहेत.
