अजगराला मारणं भोवलं, वनखात्याकडून गुन्हा दाखल, संशयितांना घेतलं ताब्यात

अंबरनाथ तालुक्यात एका अजगराची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल करत संशयितांची चौकशी सुरु केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात उसाटणे गाव आहे. या गावातील खोणी तळोजा महामार्गाच्या बाजूला आज सकाळी एक काही फोटो स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत.

अजगराचं डोकं ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पाहणी आणि पंचनामा केला. यानंतर अजरगाची हत्या करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांची चौकशी वनविभागाकडून केली जात आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वनअधिकारी विवेक नातू यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *