मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या दहीहंडीत 9 थरांची सलामी देण्यात आली. जय जवान या दहीहंडी पथकाने ही सलामी दिली. त्यामुळे दस्तुरखुद्द सत्ताधारी आमदारानेच हायकोर्टाच्या नियमांची पायमल्ली केली आहे.
मुंबईतील वांद्रे येथे भाजप आमदार आशिष शेलार यांनी दहीहंडीच्या आयोजन केलं आहे. हायकोर्टाच्या नियमांची पायमल्ली सुरुच आहे. रात्री दहानंतरही त्यांच्या दहीहंडीचा कार्यक्रम सुरु असल्याचं समोर आहे.
हायकोर्टाचे नियम मोडले असल्यास आशिष शेलारांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. मात्र, आशिष शेलारांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम मोडणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी करत अप्रत्यक्षरित्या आशिष शेलारांवर निशाणा साधला होता.
