औरंगाबादेत भूमीहीन दुष्काळग्रस्ताला दुःख अनावर, नाना आणि मकरंद समोरच आक्रोश

औरंगाबादेत भूमीहीन दुष्काळग्रस्ताला दुःख अनावर, नाना आणि मकरंद समोरच आक्रोश

दुःख अनावर झाल्यावर जेव्हा व्यथाही बोलू लागतात तेव्हा काय होतं याचा प्रत्यय औरंगाबादमध्ये पाहायला मिळाला. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावलेल्या नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यासमोर दुष्काळग्रस्तांनी अक्षरशः हंबरडा फोडला.

शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जात आहे, मात्र भूमीहीनांचं काय? अशी व्यथा एका भूमीहीन व्यक्तीने नानासमोर मांडली. त्याचं दुःख पाहून काही काळ नानाही निरुत्तर झालेला पाहायला मिळाला.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला किमान मदतीचा हात तर मिळणार आहे मात्र ज्यांच्याकडे जमिनीच नाही त्यांनी कुणाकडे पाहायचं हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला. त्यामुळे दुष्काळावर राजकारण करणाऱ्या राजकारण्यांच्या डोळ्यात या हृदयद्रावक प्रसंगानं झणझणीत अंजन घातलं जावो हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *