दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका युवकावर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील समयपूर बदली भागात ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी विपिन (वय 18) व रविंदर (वय 24) यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. विपिनच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. रविंदरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरांची ओळख पटली आहे.
