चारा-पाण्याची अवस्था बघून 72 सालचा दुष्काळ आठवला- शरद पवार

चारा-पाण्याची अवस्था बघून 72 सालचा दुष्काळ आठवला- शरद पवार

खेड्यापाड्यातली चारा-पाण्याची अवस्था बघून 72 सालचा दुष्काळ आठवला.’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यंदाच्या दुष्काळाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, म्हसव़ड, वडूज भागातील परिस्थिती पाहून पवारही हादरुन गेले. यावेळचं दुष्काळाचं संकट सगळ्यात भयानक आहे. त्यामुळं राजकारण न करता सर्वपक्षीयांनी मिळून याला तोंड द्यावं असं पवारांनी म्हटलं आहे.

तसेच पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील स्थिती त्यांच्या कानावर घालणार असल्याचंही पवार म्हणाले. आघाडी सरकारच्या काळात टँकर चालू कऱण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. ते आता राज्य सरकारकडे असल्यानं पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *