‘वन रँक वन पेन्शन’ योजनेची आज घोषणा होण्याची शक्यता

‘वन रँक वन पेन्शन’ योजनेची आज घोषणा होण्याची शक्यता

बहुप्रतीक्षित ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेसंदर्भात आज केंद्र सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने अनेकदा आश्वासनं देऊन अजूनही या मुद्यावर कोणताही निर्णय न झाल्याने लष्करातील अनेकांचे डोळे या निर्णयाकडे लागले आहेत. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

वेगवेगळ्या काळात एकाच हुद्यावर निवृत्त होणाऱ्या दोन्ही सैनिकांना एकच निवृत्त वेतन दिलं जावं, अशी मागणी लष्करी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी लावून धरली आहे. यामुळे निवृत्ती वेतनामधली मोठी तफावत नष्ट होईल.

मात्र हा निर्णय अतिशय संवदेनशील असून सरकारी तिजोरीवर नऊ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. तर या निर्णायामुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *