विल्हेवाट लावण्याआधी इंद्राणीने शीनाच्या मृतदेहाचा केला मेकअप

विल्हेवाट लावण्याआधी इंद्राणीने शीनाच्या मृतदेहाचा केला मेकअप

शीना बोरा हत्याप्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधी शीनाचा मेकअप केल्याची माहिती पोलिस तपासातून उघड झाली आहे.

इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांनी शीनाची वांद्र्यातील नॅशनल कॉलेजच्या मागे संपवलं आणि त्यानंतर तिचा मृतदेह वरळीच्या घरात आणून एका बॅगेत भरला.

यानंतर कोणालाही संशय येऊ नये यासाठी इंद्राणीने शीनाच्या मृतदेहाचे केस विंचारले आणि लिपस्टिकही लावली.  त्यानंतर कारच्या मागील सीटवर तिचा मृतदेह ठेवला आणि रायगडला रवाना झाले, असंही पोलिस तपासातून समोर आलं आहे.

इंद्राणी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना यांची सलग तिसऱ्या दिवशी समोरासमोर चौकशी झाली. याशिवाय इंद्राणीची दुसरी विधी हिचीदेखील पोलिसांनी चौकशी केली.

दरम्यान, शीना बोरा हत्याप्रकरणातील तीन्ही आरोपींना आज कोर्टात सादर केलं जाणार आहे. पोलिसांनी या प्रकरणात शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांना आरोपी म्हणून अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *