संगीतकार आदेश श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

संगीतकार आदेश श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईत प्रदिर्घ आजारानं निधन झालं. कर्करोगानं ते आजारी होते.

त्यांच्यावर अंधेरी येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
आदेश श्रीवास्तव यांनी आपल्या संगीतच्या कारर्किदीत रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘चलते चलते’, ‘बाबुल’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजनीति’ ‘देव’ यासरख्या जवळजवळ १०० चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. तसंच लोकप्रिय ‘झी सारे गम प’ या कार्यक्रमात ते जज च्या भूमिकेत सहभागी होते.
आदेश श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर आज दुपारी ओशिवारा स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. आदेश श्रीवास्तव यांच्या निधनामुळे बॉलीवडूवर शोककळा पसरलीये.  विशेष म्हणजे चार सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस होता. वाढदिवसाच्याच दिवशी लगेचच अशा प्रकारे निधन होणं ही बातमी संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी चटका लावणारी ठरलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *