दरवाज्या, कडी आणि कुलूप नसलेल्या पोलीस स्टेशनचं उदघाटन

दरवाज्या, कडी आणि कुलूप नसलेल्या पोलीस स्टेशनचं उदघाटन

अहमदनगरच्या शनिशिंगणापूरमध्ये आज देशातील आगळ्यावेगळ्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. दरवाज्या, कडी कोयांडा आणि कुलूप नसलेलं पहिलंच पोलीस स्टेशन आहे.
गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या उपस्थितित आज पोलीस ठाण्याचं उदघाटन झालं. या पोलीस ठाण्यात एक सपोनि, एक पोलीस उपनिरीक्षकसह 19 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. येत्या काळात रॅपिड अॅक्शन फोर्स आणि बॉम्ब शोधक पथकाचाही लवकरच निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी दिली आहे.

शनिशिंगणापूरला गावगुंड, लटकू एजंटंची मोठी दहशत आहे. त्याचा परिणाम भाविकांच्या गर्दीवरही झाला आहे. या पोलीस स्टेशनमुळे गावगुंडाचा बंदोबस्त करण्यास मदत होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *