पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा गेम

धक्कादायक बातमी. वादातून एकाची हत्या केल्याचे पुण्यातील भोरमध्ये उघड झाले आहे. पैशाच्या देवाण-घेवाणच्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. केवळ 180 रुपयांसाठी मद्यपी मित्राची हत्या केली. पोलिसांनी तीन तासांच्या आत आरोपीला अटक केली.

मद्यपी मित्रांमध्ये, पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन आधी वाद झाला. त्यानंतर वादातून दोघांमध्ये मारहाण झाली. यावेळी खाली पडलेल्या कन्हैया गायकवाड याच्या छातीवर दगड घालून हत्या करण्यात आली. केवळ 180 रुपयांसाठी दोघा मित्रांमध्ये वाद उफाळला. त्यानंतर देवराम माने यांने आपल्या मित्राचा काटा काढला.

ही घटना भोरच्या स्मशान भूमीच्या शेडमध्ये घडली. यातील आरोपी देवराम माने पळून जाण्याच्या तयारीत असताना तीन तासांच्या आतमध्ये अटक करण्यात आलीय. 180 रुपये घेतल्याच्या कारणावरुन ही मारामारी झाली. मारामारी दरम्यान आरोपीने मयत अक्षयच्या छातीवर आणि गुप्तांगावर दगड मारल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती भोर पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *