चार मुली झाल्यात. पण मुलगा झाला नाही, म्हणून माथेफिरु पती पत्नीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची धक्कादायकबाब पुण्यात समोर आली आहे. या अत्याचाराला कंटाळून पत्नीने धाडस दाखवत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली.
अत्याचार करणारा पती हा पत्नीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिचा छळ करत होता. तसेच पत्नीच्या मनाविरुध्द नैसर्गिक अत्याचार करत होता. तो एवडा नालायक होता की तो आपल्या पोटच्या मुलीसमोर स्वतःची कपडे काढून अश्लिल वर्तन करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. अत्याचार करणाऱ्याला पतीला कोंढवा पोलिसांनी अटक केली. हा प्रकार 2009 पासून सुरु होता. याबाबत पिडीत पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
कोंढवा परिसरात एक दाम्पत्य राहत आहे. त्यांना चार मुली आहेत. मुलगा व्हावा यासाठी आरोपी पतीचा अट्टाहास होता. त्याचपोटी तो पत्नीच्या मनाविरुध्द पॉर्न व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार करत होता. आपण काय करतो याचेही भान त्याला नव्हते. आपल्या पोटच्या मुलीसमोरच तो कपडे काढून अश्लिल वर्तन करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. त्याला चारही मुलीच असल्याने पत्नीला मारहाणही करत होता. त्यांने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यास विरोध केला होता. तसेच तो पत्नीचा नाहक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
