महामार्गावर बर्निंग डंपरचा थरार, मागील टायरला अचानक आग

 पुणे सातारा महामार्गावर बर्निंग डंपरचा पाहायला मिळाला. यावेळी महामार्गावरची वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. या महामार्गावरील हरिश्चंद्री गावच्या हद्दीत डंपर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जातं असताना ही घटना घडलीय.

डंपर पुण्याच्या दिशेनेजातं असताना अचानक त्याच्या मागील टायरला आग लागली, काही वेळातचं आग भडकली आणि डंपरने पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची बातमी समजताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर तातडीने पाण्याच्या टँकर मागवून आग विजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीचं प्रमाण जास्त असल्याने यात डंपरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. डंपरला आग लागल्यानं या मार्गावरची वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *