देशातील पहिलं समलिंगी लग्न करु पाहणाऱ्या मुंबईतल्या हरीश अय्यरला फक्त एका जाहीरातीनंतर 100 हून अधिक प्रस्ताव आले आहेत.
चार दिवसांपूर्वी हरीशच्या आईनेच मुलाच्या लग्नासाठी मुलगा हवा, अशी वर्तमानपत्रामध्ये जाहीरात दिली होती. त्यानंतर आता अवघ्या चार दिवसातच त्याला लग्नासाठी 100हून अधिक प्रस्ताव आले आहेत.
पुणे, चेन्न्ई आणि कोलकाता इथल्या डॉक्टर, इंजिनिअर्सनी त्याच्यासोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली आहे.
भारतातूनच नाही तर अमेरिका, इंग्लंडमधून हरीशला होकार आला आहे. एक प्रस्ताव तर सौदी अरेबियातल्या शेखकडून आला आहे. हरीश अय्यरच्या आईला मेल करुन अनेकांनी हरीशसोबत लग्नबाबतचे प्रस्ताव पाठवले आहेत.
हरीश अय्यर हे नाव तसं प्रचलित आहे. हरीश एक प्रसिद्ध एलजीबीटी कार्यकर्ता आ
हे. तो युनायटेड वे ऑफ मुंबई या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे. इतकंच नाही तर वर्ल्ड प्राईड पॉवरलिस्ट-2013 मध्ये त्याला 71व्या स्थानावर जागा देण्यात आली होती. या यादीत सर एल्टन जॉन, मार्टिना नवरातिलोवा, रिकी मार्टिन यांसारखे प्रसिद्ध लोकांचा समावेश आहे. शिवाय आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातही तो आला होता.
हरीशच्या आईने दिलेल्या जाहिरातीची जगभरात चर्चा सुरु आहे. आता हरीश आणि त्याची आई पद्मा अय्यर यांना विश्वास आहे की हरीशला लवकरच योग्य ‘वर’ मिळेल.