मध्य रेल्वेवर सलग दुसऱ्या दिवशी खोळंबा; एक्स्प्रेस अडकल्याने लोकल धीम्या गतीने

मध्य रेल्वेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे कर्जत ते बदलापूर आणि मुंबई रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. याचा फटका सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना बसत आहे.

हे इंजिन मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर जवळपास पाऊण तासाहून जास्त वेळ बंद पडलं होतं. दरम्यान बंद पडलेल्या एक्स्पेसचं इंजिन दुरुस्त झालं आहे. पण याचा परिमाण लोकलच्या वेळापत्रकावर झाला आहे. साडे सहापासून ठप्प असलेली वाहतूक सध्या दोन तासांनी धीम्या गतीने सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *