शाळेतून परत येत असताना एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरुन विनयभंग केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जवळा खुर्द येथे समाज मंदिरासमोर घडली आहे. याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकीदेखील आरोपीने पीडित मुलीला दिली आहे. याबाबत मुलीच्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात आरोपी शुभम सुभाष डोंगरे आणि सौरभ सुभाष डोंगरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जवळा खुर्द येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी नियमितपणे शाळेवरून घरी परत येत असताना गावातील शुभम सुभाष डोंगरे आणि सौरभ सुभाष डोंगरे या दोघांनी गावातील समाज मंदिरासमोर मुलीला थांबवले आणि वाईट उद्देशाने मुलीचा हात धरून तिचा विनयभंग केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी अल्पवयीन मुलीला दिली. यानंतर मुलीने घडलेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शुभम सुभाष डोंगरे आणि सौरभ सुभाष डोंगरे यांच्याविरोधात मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बोरी पोलिस करत आहेत.
दरम्यान, राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना जवळा खुर्द येथे घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा मुलींच्या व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलींना शिक्षणासाठी घराबाहेर पाठवावे की नाही असा प्रश्न या घटनेमुळे नागरिकांना पडला आहे.
