पाणी पुरवठ्याबाबत मोठी बातमी, मुंबईत या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

पाणी पुरवठ्याबात महत्वाची बातमी. तानसा पूर्व आणि पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईला शहरात काही ठिकाणी दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. सोमवार आणि मंगळवारी हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

त्यामुळे या  कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

सोमवारी 14 रोजी सकाळी 8 ते मंगळवार, 15 मार्च 2022 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात  आले आहे. जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर जी/दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात 1450 मिलीमीटर व्यासाच्या  तानसा पूर्व आणि पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम सोमवारी 14 ते 15 मार्च  रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.  काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर जी/दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

जी/दक्षिण विभागः डिलाई रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत,  संपूर्ण  लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग  येथे तसेच  जी/उत्तर विभागः संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर  मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभाग  येथे पाणीपुरवठा होणार नाही.

तसेच जी/दक्षिण विभागः ना. म. जोशी मार्ग, डिलाई रोड बी.डी.डी., सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग – (मंगळवार दिनांक 15 मार्च 2022 रोजी पहाटे 4.30  ते सकाळी 7.45  वाजता डिलाई रोड पाणीपुरवठा पाणीपुरवठा होणार नाही. तर जी/दक्षिण विभागः धोबीघाट, सातरस्ता – (मंगळवार दिनांक 15 मार्च  रोजी पहाटे 4 ते सकाळी  7 वाजता डिलाई रोड येथे पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *