400 फूट दरीनं भरधाव कारला गिळलं, पाहा अपघाताचे भीषण फोटो

आंबा घाटात 400 फूट खोल दरीत कार कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच देवरुख साखरपा पोलीस आणि स्थानिक नागरिक आणि व स्वयंसेवी संस्थाचे लोक घटनास्थळी दाखल झाले. या सगळ्यांनी मिळून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.

अपघातग्रस्त गाडीत 6 जण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर 3 जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत तिघेही सांगली जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे.

आंबा घाटामध्ये 400 फूट कार दरीत कोसळली. या भीषण अपघाता कारची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्याचे फोटो पाहून लक्षात येईल किती भयंकर हा अपघात झाला आहे.

या अपघाताचं कारण अद्याप समोर आलं नाही. गाडी वेगात होती की गाडीचा ब्रेक फेल झाला होता की नियंत्रण सुटलं त्यामुळे हा प्रकार घडला असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. सध्या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *