दोन वर्षांनंतर उतरला मास्क; रायगडकर घेणार आता मोकळा श्वास

रायगडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही विनामास्क जिल्ह्यात फिरत असाल तर आता पोलीस तुमच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत. विना मास्क फिरणाऱ्यावर केसेस करू नका असे आदेश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक याच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी यांना पत्र जारी केले आहे. त्यामुळे रायगडकरांसह पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे.

https://www.raigadtimes.co.in/Encyc/2022/3/10/The-mask-landed-two-years-later-Raigadkar-will-take-a-deep-breath-now.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *