राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी कर्मचारी सेवापुस्तकात बनावट नोंदी करून राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यासह दोन लिपिकांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश अशोक जगताप (नेम. विशेष शाखा), नितेश अरविंद आयनुर (नेम. गोपनीय शाखा), रविंद्र धोंडीबा बांदल (नेम. इमारत शाखा, आयुक्त कार्यालय) व अन्य काहींवर गुन्हा दाखल आहे. याबत संतोष प्रतापराव भोसले (वरिष्ठ लिपिक, परिमंडळ ५) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार २६ जुलै २०१७ ते २९ जानेवारी २०२० या कालावधीत घडला.
