हिंगोलीत धक्कादायक घटना; दारूच्या नशेत घेतला गळफास

दारूने एक ना अनेक जणांचे संसार उघड्यावर आणल्याचे आपण दररोज आपल्या जीवनात उदाहरण अनुभवत असतो. दारूची नशा करणाऱ्या व्यक्तींच्या घरात नेहमीच तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येते. सोबतच अतिरिक्त व्यसनामुळे शरीरावर होणारा परिणाम वेगळा, त्याचं बरोबर मानसिक तणावामध्ये येऊन अनेक वेळा अनेक ठिकाणी टोकाचे पाऊल उचलले असल्याच्या घटना देखील आपण पहातो. काल हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरांमध्ये बुधवार पेठेत राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

गजानन गंगाराम मज्जनवार असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन या प्रकरणी पोलिस सध्या अधिक तपास करीत आहेत. गजानन हा मागील काही दिवसांपासून तणावात दिसून येत असल्याचे नातेवाईक व मित्रमंडळीचे म्हणणे आहे. त्यामुळे तो काही दिवसापासून अधिकाधिक प्रमाणात दारूच्या आहारी गेल्याचे ही बोलले जात आहे. दारुच्या नशेतच त्याने हे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. अचानक घडलेल्या या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात होती. गजानन यांच्या निघून जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मात्र, अद्याप पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीये. तसंच, त्याच्या आत्महत्येचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्येपूर्वी गजानन यांने सुसाइड नोटही लिहून ठेवली नव्हती. त्यामुळं गुंतागुंत अधिक वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *